Divisibility Rule of 7 in Marathi :- गणितात विभाज्यतेच्या कसोट्या (Divisibility Rules) या अतिशय उपयुक्त असतात, विशेषतः जेव्हा मोठ्या संख्यांवर कार्य करायचं असतं.
7 ची कसोटी थोडी अवघड वाटू शकते, पण जर आपण Seed Number (बिजांक संख्या) या संकल्पनेचा आधार घेतला, तर ही प्रक्रियाही खूप सोपी होऊ शकते.
या लेखात आपण 7 ने भाग जातो का हे तपासण्यासाठी तीन प्रभावी आणि वेगवेगळ्या पद्धती पाहणार आहोत — सोप्या स्टेप्ससह उदाहरणांसहित!
Must Read : Seed Number म्हणजे काय?
तुम्हाला 7 ची कसोटी समजून घ्यायची असेल, तर Seed Number ही संकल्पना आधी स्पष्ट असावी — ती समजल्यास विभाज्यता तपासणे अधिक सुलभ होते.
7 ची विभाज्यतेची कसोटी | Divisibility Rule of 7 in Marathi
Method I – वजा करण्याची पद्धत :
दिलेल्या संख्येतील एककस्थानी संख्येला 2 ने गुणा करा आणि तो गुणाकार उरलेल्या संख्येतून वजा करा. नवीन आलेल्या संख्येला जर 7 ने भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येलाही 7 ने भाग जातो.
- उदाहरण 1 : 19677
- Step 1 : 196|7 → 196 – (7 × 2) = 182
- Step 2 : 18|2 → 18 – (2 × 2) = 14
- 14 ला 7 ने भाग जातो → म्हणून 19677 ला देखील 7 ने भाग जातो.
- उदाहरण 2 : 31976
- Step 1 : 3197|6 → 3197 – (6 × 2) = 3185
- Step 2 : 318|5 → 318 – (5 × 2) = 308
- Step 3 : 30|8 → 30 – (8 × 2) = 14
- 14 ला 7 ने भाग जातो → म्हणून 31976 ला देखील 7 ने भाग जातो.

Method II – बेरीज करून तपासणे :
दिलेल्या संख्येतील एककस्थानी संख्येला 5 ने गुणा करा आणि तो गुणाकार उरलेल्या संख्येत मिळवावा. नवीन आलेल्या संख्येला जर 7 ने भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येलाही 7 ने भाग जातो.
- उदाहरण : 19677
- Step 1: 196|7 → 196 + (7 × 5) = 231
- Step 2: 23|1 → 23 + (1 × 5) = 28
- 28 ला 7 ने भाग जातो → म्हणून 19677 ला देखील 7 ने भाग जातो.
- उदाहरण 2 : 31976
- Step 1 : 3197|6 → 3197 + (6 × 5) = 3227
- Step 2 : 322|7 → 322 + (7 × 5) = 357
- Step 3 : 35|7 → 35 + (7 × 5) = 70
- 70 ला 7 ने भाग जातो → म्हणून 31976 ला देखील 7 ने भाग जातो.

Method III – 6 च्या पटीत आलेली पुनरावृत्ती संख्यांची पद्धत:
जर एखादी संख्या अशी असेल की तिचे सर्व अंक एकाच पद्धतीने 6 च्या पटीत (जसे: 111111, 222222…) आहेत, तर त्या संख्येला 7 ने भाग जातो.
- उदाहरण :
- 111111 → 111111 ÷ 7 = 15873
- 222222 → 222222 ÷ 7 = 31746
- 333333 → 333333 ÷ 7 = 47619
- 444444 → 444444 ÷ 7 = 63492
- 555555 → 555555 ÷ 7 = 79365
- या सर्व संख्यांना 7 ने भाग जातो.
Method IV –
जर दिलेल्या संखेच्या शेवटच्या तीन अंकांनी तयार झालेल्या संख्येतून पहिल्या तीन अंकांची संख्या वजा करून येणाऱ्या वजाबाकी च्या उत्तराला जर 7 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो.

- उदाहरण 1 : 483217
- शेवटचे 3 अंक = 217
- सुरुवातीचे 3 अंक = 483
- वजाबाकी = 217 – 483 = –266
- आता –266 ला 7 ने भाग जातो का?
- 266 ÷ 7 = 38 (पूर्ण भाग गेला)
- म्हणून, 483217 ला 7 ने भाग जातो.
- उदाहरण 2 : 123456
- शेवटचे 3 अंक = 456
- सुरुवातीचे 3 अंक = 123
- वजाबाकी = 456 – 123 = 333
- 333 ÷ 7 = 47.57… (पूर्ण भाग जात नाही)
- म्हणून, 123456 ला 7 ने भाग जात नाही.
निष्कर्ष :
7 ने भाग जातो का हे तपासण्यासाठी या तीन पद्धती (विशेषतः Seed Number चा उपयोग करून) तुम्हाला कोणतीही संख्या सोप्या पद्धतीने तपासता येईल.
स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा या तंत्रांचा सराव केल्यास तुमचा वेळ वाचेल आणि अचूकता वाढेल.
GanitiGuru कडून अशाच रंजक व माहितीपूर्ण गणित संकल्पनांसाठी आमचे पेज फॉलो करा!
गणितिगुरुला टेलीग्रामवर फॉलो करा
