Easy Trick for Square of Numbers Ending in 3

एककस्थानी 3 असलेल्या संख्येचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत | Easy Trick for Square of Numbers Ending in 3

एककस्थानी 3 असलेल्या संख्येचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत | Easy Trick for Square of Numbers Ending in 3

नमस्कार मंडळी!
आपण आधी एककस्थानी 2 असलेल्या संख्यांचे वर्ग पाहिले.
आता पाहूया एककस्थानी 3 असलेल्या संख्यांचा वर्ग जलद आणि तोंडी कसा काढायचा.
थोडी पाढ्यांची आणि वर्गांची माहिती असेल, तर ही पद्धत वापरून तुम्ही 2 ते 5 सेकंदांत उत्तर मिळवू शकता.

पद्धत 1 – शतक-दशक-एकक पद्धत

उदाहरण: 23²

  • 2 चा वर्ग त्यावर दोन शुन्य द्यावेत ( 2 चा वर्ग शतक रकान्यात लिहावा)
  • 2×3 या गुणाकारांची दुप्पट करून त्यावर एक शुन्य द्यावा.[ 2(3×2) दशक ठिकाणी ]
  • 3 चा वर्ग एकक रकान्यात लिहावा.
  • उत्तर: 529
शतकदशकएकक
22  = 400
2 × ( 3 × 2 ) = 120
 32 = 9
शतकदशकएकक
400
120
 9
529

पद्धत 2 – वर्गाचा विस्तार करून संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत

उदाहरण: 42²

  • 132 = (10 + 3)2 = 102 + 2 x 10 x 3 + 32 = 100 + 60 + 9 = 169
  • 332 = (30 + 3)2 = 302 + 2 x 30 x 3 + 32 = 900 + 180 + 9 = 1089

पद्धत 3 – जर एखाद्या दोन अंकी संख्येच्या एककस्थानी 3 असेल आणि त्या संख्येचा वर्ग काढायचा असेल तर खालील सुत्राचा वापर करावा.

उदाहरणे:

  • 13² = 1 | 6 | 9 = 169
  • 53² = 25 | 30 | 9 = 2809
  • 93² = 81 | 54 | 9 = 8649

पद्धत 4 – जर एखाद्या संख्येत सर्व 3 असल्यास वर्ग करण्याची पद्धत

दिलेल्या संख्येमध्ये जेवढे 3 असतील तितक्या वेळा 3 चा पाढा सरळ व उलटा लिहीवा आणि त्याला 3 ने गुणावे आणि त्यापासून मिळणारी संख्या म्हणजे वर्ग होय, सविस्तर समजावून घेण्यासाठी खालील उदाहरणाची मदत घ्यावी.

उदाहरण:

  • 33 चा वर्ग
    • 332 = 3 × 3 | 6 × 3 | 3 × 3
    • 332 = 9 | 18 | 9
    • 332 = 1089
  • 333 चा वर्ग
    • 3332 = 3 × 3 | 6 × 3 | 9 × 3 | 6 × 3 | 3 × 3
    • 3332 = 9 | 18 | 27 | 18 | 9
    • 3332 = 110889
  • 3333 चा वर्ग
    • 33332 = 3 × 3 | 6 × 3 | 9 × 3 | 12 × 3 | 9 × 3 | 6 × 3 | 3 × 3
    • 33332 = 9 | 18 | 27 | 36 | 27 | 18 | 9
    • 33332 = 11108889

32 = 9

332 = 1089

3332= 110889

33332 = 11108889

333332 = 1111088889

3333332 = 111110888889

33333332 = 11111108888889

333333332 = 1111111088888889

3333333332 = 111111110888888889

Frequently Asked Questions – Easy Trick for Square of Numbers Ending in 3

Q. 13 चा वर्ग किती?

उत्तर : 13 चा वर्ग 169 आहे.

Q. 23 चा वर्ग किती?

उत्तर : 23 चा वर्ग 529 आहे.

Q. 33 चा वर्ग किती?

उत्तर : 33 चा वर्ग 1089 आहे.

Q. 43 चा वर्ग किती?

उत्तर : 43 चा वर्ग 1849 आहे.

Q. 53 चा वर्ग किती?

उत्तर : 53 चा वर्ग 2809 आहे.

Q. 63 चा वर्ग किती?

उत्तर : 63 चा वर्ग 3969 आहे.

Q. 73 चा वर्ग किती?

उत्तर : 73 चा वर्ग 5329 आहे.

Q. 83 चा वर्ग किती?

उत्तर : 83 चा वर्ग 6889 आहे.

Q. 93 चा वर्ग किती?

उत्तर : 93 चा वर्ग 8649 आहे.

निष्कर्ष – Easy Trick for Square of Numbers Ending in 3

या पद्धती वापरून एककस्थानी 3 असलेल्या संख्यांचे वर्ग अतिशय जलद काढता येतात.
ही ट्रिक्स स्पर्धा परीक्षा, जलद गणित, आणि व्हेदिक मॅथ्स शिकणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त आहेत.

GanitiGuru कडून आणखी अशा रंजक व सोप्या गणिती ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमचे पेज फॉलो करा!

गणितिगुरुला टेलीग्रामवर फॉलो करा

ganitiguru

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *