Unit of Work in Marathi

कार्यचे एकक | Unit of Work in Marathi

कार्यचे एकक | Unit of Work in Marathi :- गणित व भौतिकशास्त्रात “कार्य” हा एक मूलभूत संकल्पना आहे. दैनंदिन जीवनात आपण जेव्हा एखादी वस्तू हलवतो, ढकलतो किंवा उचलतो, तेव्हा आपण कार्य करीत असतो. भौतिकशास्त्रात कार्याची मोजणी व त्याचे एकक जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

कार्य म्हणजे काय? | Work in Marathi

विकिपीडिया नुसार:
कार्य (Work) हे एक आदिश राशी आहे, ज्याला फक्त परिमाण असते, दिशा नसते.
एखाद्या वस्तूवर बल (Force) लावल्यामुळे ती वस्तू बलाच्या दिशेने काही अंतर (Displacement) सरकली तर त्या वस्तूवर केलेले कार्य असे म्हणतात.

कार्यची व्याख्या | Definition of Work in Marathi

कार्य म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय.

कार्य म्हणजे काय?

कार्याचे सूत्र | Formula of Work in Marathi

सूत्र:

इथे,

  • W = कार्य (Work)
  • F = बल (Force)
  • d = स्थानांतर (Displacement)
  • θ = बल आणि स्थानांतर यामधील कोन
कार्याचे सूत्र

कार्याची वैशिष्ट्ये

  1. कार्य हा आदिश राशी आहे – दिशा नसते, फक्त परिमाण असते.
  2. कार्य धनात्मक (+) किंवा ऋणात्मक (–) असू शकते:
    • धनात्मक कार्य: बल आणि स्थानांतर एकाच दिशेने असेल.
    • ऋणात्मक कार्य: बल आणि स्थानांतर विरुद्ध दिशेने असेल.
  3. कार्य होण्यासाठी वस्तूचे स्थानांतर आवश्यक आहे.

कार्याचे एकक | Unit of Work in Marathi

  • SI पद्धतीत कार्यचे एकक ज्यूल आहे.
  • CGS पद्धतीत शक्तीचे एकक अर्ग आहे.
  • परिभाषा: 1 ज्यूल कार्य तेव्हा होतो जेव्हा 1 न्यूटन बल एखाद्या वस्तूवर लावला जातो आणि वस्तू बलाच्या दिशेने 1 मीटर सरकते.
Unit of Work in Marathi

1 ज्यूल= 1 न्यूटन × 1 मीटर

1 न्यूटन = 1 किग्रॅ × 1 मीटर/सेकंद²
म्हणून,

कार्याचे इतर एकके | Other Units of Work

UnitsEquivalent in Joules
1 अर्ग (erg)1.0 × 10⁻⁷ J
1 अश्वशक्ती-तास (hp·hr)2,684,519.54 J
1 न्यूटन-मीटर (N·m)1 J
1 फूट-पाउंड (ft·lb)1.35582 J
1 किलोवॅट-तास (kW·hr)3.6 × 10⁶ J
1 BTU1055.06 J

कार्याचे प्रकार | Types of Work in Marathi

1. धन कार्य (Positive Work)

  • पदार्थांचे विस्थापन जेव्हा बलाच्या दिशेने होते, त्यावेळी बलाने केलेले कार्य धन कार्य असते.
  • कोन (θ) = 0°
  • उदाहरणे:
    1. एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर खाली पडत असताना गुरुत्व बलाच्या दिशेने कार्य होते.
    2. बंद पडलेल्या गाडीला धक्का दिल्यानंतर ती गाडी समोरच्या दिशेने विस्थापित होणे.

2. ऋण कार्य (Negative Work)

  • पदार्थांचे विस्थापन जेव्हा बलाच्या विरुद्ध दिशेने होते, तेव्हा केलेले कार्य ऋण कार्य असते.
  • कोन (θ) = 180°
  • उदाहरणे:
    1. क्रिकेटमध्ये खेळाडू एखादा चेंडू अडवतो.
    2. गतिमान गाडीला ब्रेक मारणे.
    3. शिडीवरून वर चढणे (गुरुत्व बलाच्या विरुद्ध कार्य).

3. शून्य कार्य (Zero Work)

  • ज्यावेळी बल लावूनही विस्थापन होत नाही किंवा बल आणि विस्थापन एकमेकांना लंबरूप (perpendicular) असतात, तेव्हा कार्य शून्य असते.
  • कोन (θ) = 90°
  • उदाहरणे:
    1. दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल-गोल फिरवताना केंद्रीय बल कार्यरत असते, पण विस्थापन लंबरूप असल्याने कार्य शून्य होते.
    2. मोठा दगड हलवण्याचा प्रयत्न केल्यावरही दगडाचे विस्थापन न झाल्यास कार्य शून्य असते.

Frequently Asked Questions – FAQs (Work in Marathi)

Q1. कार्य कशाला म्हणतात?

उत्तर : कार्य म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय.

Q2. कार्यचे SI पद्धतीतील एकक काय आहे?

उत्तर : कार्यचे SI एकक ज्यूल (I) आहे.

Q3. कार्यचे CGS पद्धतीतील एकक काय आहे?

उत्तर : कार्यचे CGS एकक अर्ग आहे.

Q4: 1 ज्युल म्हणजे काय?

उत्तर : जेव्हा 1 न्यूटन बल लावल्यावर वस्तू 1 मीटर अंतराने बलाच्या दिशेने हलते, तेव्हा केलेले कार्य 1 ज्युल असते.

Q5. धन कार्य म्हणजे काय?

उत्तर : धन कार्य तेव्हा होते, जेव्हा वस्तूचे विस्थापन हे बलाच्या दिशेने होते.
म्हणजेच, बल आणि विस्थापन यांच्या मधील कोन (θ) असतो.

Q6. ऋण कार्य म्हणजे काय?

उत्तर : पदार्थांचे विस्थापन जेव्हा बलाच्या विरुद्ध दिशेने होते, तेव्हा केलेले कार्य ऋण कार्य असते.

Q7. शून्य कार्य म्हणजे काय?

उत्तर : ज्यावेळी बल लावूनही विस्थापन होत नाही किंवा बल आणि विस्थापन एकमेकांना लंबरूप (perpendicular) असतात, तेव्हा कार्य शून्य असते.

Q8. कार्याचे सूत्र काय आहे?

उत्तर : कार्य काढण्यासाठीचे मूलभूत सूत्र असे आहे —
W = F⋅d⋅cosθ
इथे:
W = कार्य (Work)
F = लावलेले बल (Force in Newtons)
d = वस्तूचे विस्थापन (Displacement in meters)
θ = बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा यांमधील कोन

निष्कर्ष – Work in Marathi

कार्य हा भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे, ज्यामध्ये बल व विस्थापनाचा परस्पर संबंध स्पष्ट होतो. एखाद्या वस्तूवर बल लावून, त्या वस्तूचे विस्थापन घडवून आणल्यास कार्य होते. कार्याचे स्वरूप हे धन, ऋण किंवा शून्य असे असू शकते, जे बल व विस्थापनाच्या दिशांवर अवलंबून असते.

धन कार्य वस्तूची ऊर्जा वाढवते, तर ऋण कार्य ऊर्जा कमी करते आणि शून्य कार्यामध्ये ऊर्जा हस्तांतरण होत नाही. कार्याचे मोजमाप ज्युल (Joule) या एककात केले जाते.
दैनंदिन जीवनात, विज्ञान-तंत्रज्ञानात व औद्योगिक क्षेत्रात कार्याची संकल्पना महत्त्वाची भूमिका बजावते, कारण ती ऊर्जा हस्तांतरणाचे मापन व विश्लेषण करण्यासाठी वापरली जाते.


अशाच रंजक आणि सोप्या विज्ञानविषयक माहिती, प्रयोग, आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी GanitiGuru ला फॉलो करा!
गणितासोबतच विज्ञानही आता सोपं आणि मजेदार!

गणितिगुरुला टेलीग्रामवर फॉलो करा

ganitiguru

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *