Divisibility Rule of 11 in Marathi

11 ची विभाज्यतेची कसोटी | Divisibility Rule of 11 in Marathi

Divisibility Rule of 11 in Marathi : गणितात विभाज्यतेच्या कसोट्या अत्यंत उपयुक्त असतात, विशेषतः जेव्हा मोठ्या संख्यांवर जलद काम करायचं असतं.
11 ची कसोटी थोडी वेगळी आहे, पण एक सोपी पद्धत वापरल्यास ती अगदी सहज समजते.

Must Read : Seed Number म्हणजे काय?
तुम्हाला 11 ची कसोटी समजून घ्यायची असेल, तर Seed Number ही संकल्पना आधी स्पष्ट असावी — ती समजल्यास विभाज्यता तपासणे अधिक सुलभ होते.

11 ची विभाज्यतेची कसोटी | Divisibility Rule of 11 in Marathi

Method I – वजा करण्याची पद्धत :

दिलेल्या संख्येतील एककस्थानी संख्येला 1 ने गुणा करा आणि तो गुणाकार उरलेल्या संख्येतून वजा करा. नवीन आलेल्या संख्येला जर 11 ने भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येलाही 11 ने भाग जातो.

पायरी:

  1. संख्येच्या शेवटच्या (एकक) अंकाला 1 ने गुणा करा.
  2. तो गुणाकार उरलेल्या संख्येतून वजा करा.
  3. नवीन आलेल्या संख्येला जर 11 ने भाग जात असेल, तर मूळ संख्येलाही 11 ने भाग जातो.
  • उदाहरण 1 : 121
    • एककस्थानी अंक = 1 → 1×1=11
    • उरलेली संख्या = 12
    • वजाबाकी: 12−1=11
    • 11 ने भाग जातो → म्हणून 121 ही संख्या 11 ने विभाज्य आहे.
Divisibility Rule of 11 in Marathi

Method II – बेरीज करून तपासणे :

दिलेल्या संख्येतील एककस्थानी संख्येला 10 ने गुणा करा आणि तो गुणाकार उरलेल्या संख्येत मिळवावा. नवीन आलेल्या संख्येला जर 11 ने भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येलाही 11 ने भाग जातो.

पायरी:

  1. संख्येच्या शेवटच्या अंकाला 10 ने गुणा करा.
  2. तो गुणाकार उरलेल्या संख्येत जोडा.
  3. जर नवीन आलेली संख्या 11 ने भाग जाणारी असेल, तर मूळ संख्येलाही 11 ने भाग जातो.
  • उदाहरण 1 : 121
    • एककस्थानी अंक = 1 → 1×10=101
    • उरलेली संख्या = 12
    • बेरीज: 12+10=22
    • 11 ने भाग जातो → म्हणून 121 ही संख्या 11 ने विभाज्य आहे.
Divisibility Rule of 11 in Marathi

Method III – फरक काढण्याची पद्धत :

ज्या संख्येतील एकाआड एक अंकांची बेरीज करून त्यांचा फरक घेतल्यावर तो फरक जर 0 किंवा 11 च्या पटीत असेल, तर त्या संख्येला 11 ने भाग जातो.

हे कसे तपासायचे?

  1. एका संख्येतील अंकांना एकाआड चिन्ह (+ आणि –) द्या.
    उदा: पहिला अंक +, दुसरा –, तिसरा +, चौथा – …
  2. त्या बेरीज-वजाबाकीचा अंतिम फरक काढा.
  3. जर तो फरक 0 किंवा 11, 22, 33, … अशा 11 च्या पटीतील असेल, तर ती संख्या 11 ने विभाज्य असते.
  • उदाहरण 1 : 121
    • +1 – 2 + 1 = 0
    • 0 हा 11 च्या पटीत आहे → विभाज्य
  • उदाहरण 2 : 308
    • +3 – 0 + 8 = 11
    • 11 हा 11 च्या पटीत आहे → विभाज्य
  • उदाहरण 3 : 12345
    • +1 – 2 + 3 – 4 + 5 = 9 – 6 = 3
    • 3 हा 11 च्या पटीत नाही → विभाज्य नाही
Divisibility Rule of 11 in Marathi

निष्कर्ष : 11 ची कसोटी

  • 11 ने भाग जातो का? हे तपासण्यासाठी आपण एकाआड एक अंकांची बेरीज व वजाबाकी करतो.
  • या बेरीज-वजाबाकीचा फरक जर 0 किंवा 11 च्या पटीत असेल (उदा. 11, 22, 33…), तर ती संख्या 11 ने विभाज्य असते.
  • यासाठी तीन पद्धती वापरता येतात:
    1. वजा करण्याची पद्धत – एककस्थानी अंक ×1 वजा करा.
    2. बेरीज पद्धत – एककस्थानी अंक ×10 बेरीज करा.
    3. फरक काढण्याची पद्धत – एकाआड एक बेरीज-वजाबाकी करून फरक तपासा.
  • या तांत्रिक पद्धती सोप्या उदाहरणांसह वापरल्यास, मोठ्या संख्यांचे विभाज्यता तपासणे सहज शक्य होते.

GanitiGuru कडून अशाच रंजक व माहितीपूर्ण गणित संकल्पनांसाठी आमचे पेज फॉलो करा!

गणितिगुरुला टेलीग्रामवर फॉलो करा

ganitiguru

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *