महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – 10,000+ जागांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्र सरकारने पोलीस शिपाई भरती 2025 साठी 10,000 पेक्षा अधिक पदांची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप जाणून घेणे अत्यावश्यक आहे. या लेखामध्ये तुम्हाला Police Bharti Syllabus 2025 in Marathi PDF सोबत लेखी व शारीरिक चाचणीबाबत सर्व तपशील मिळणार आहेत.
Maharashtra Police Bharti 2025 – भरतीचा आढावा
घटक | तपशील |
---|---|
भरतीचे नाव | महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2025 |
एकूण पदे | 10,000+ |
पदाचे नाव | पोलीस शिपाई / चालक |
निवड प्रक्रिया | शारीरिक + लेखी परीक्षा |
परीक्षा पद्धत | Offline |
अधिकृत संकेतस्थळ | mahapolice.gov.in |
Maharashtra Police Bharti परीक्षा पद्धत (Exam Pattern)
शारीरिक चाचणी (Physical Test) – 50 गुण
पुरुष उमेदवार
- 1600 मीटर धावणे – 20 गुण
- 100 मीटर धावणे – 15 गुण
- गोळाफेक (7.26 किग्रॅ) – 15 गुण
महिला उमेदवार
- 800 मीटर धावणे – 20 गुण
- 100 मीटर धावणे – 15 गुण
- गोळाफेक (4 किग्रॅ) – 15 गुण
Maharashtra Police Written Exam Pattern 2025
लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असते.
विषय | प्रश्न संख्या | गुण |
---|---|---|
अंकगणित | 25 | 25 |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 25 | 25 |
बुध्दीमत्ता चाचणी | 25 | 25 |
मराठी व्याकरण | 25 | 25 |
एकूण | 100 | 100 |
परीक्षा कालावधी: 90 मिनिटे
किमान पात्रता: 40% गुण आवश्यक
Maharashtra Police Bharti Syllabus 2025 (विषयवार अभ्यासक्रम)
➤ गणित:
- संख्या व प्रकार
- चार गणिती क्रिया (बेरीज-वजाबाकी इ.)
- कसोट्या
- पूर्णांक / अपूर्णांक
- म.सा.वी / ल.सा.वी
- वर्ग / वर्गमूळ
- घन / घनमूळ
- शेकडेवारी
- भागीदारी
- प्रमाण / गुणोत्तर
- सरासरी
- वेळ, काम, वेग
- दशमान पद्धती
- नफा-तोटा
- सरळव्याज / चक्रवाढ व्याज
- घातांक
- घड्याळ आधारित प्रश्न
➤ बुध्दीमत्ता चाचणी (Reasoning):
- संख्या / अक्षर मालिका
- व्हेन आकृती
- सांकेतिक भाषा / लिपी
- दिशा
- नातेसंबंध
- तर्क
- घड्याळ आधारित प्रश्न
➤ मराठी व्याकरण:
- समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग / वचन
- संधि
- वर्णमाला
- नाम / सर्वनाम / विशेषण
- क्रियापद / काळ / प्रयोग
- समास
- वाक्प्रचार
- म्हणी
➤ सामान्य ज्ञान व चालू घडामोडी:
- भूगोल
- महाराष्ट्राचा भूगोल
- भारताचा भूगोल
- इतिहास
- 1857 चा उठाव
- भारताचे व्हाईसरॉय
- समाजसुधारक
- राष्ट्रीय सभा
- भारतीय स्वातंत्र्यलढा
- ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रह
- 1909 कायदा
- 1919 कायदा
- 1935 कायदा
- हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी (HSRA)
- पंचायतराज
- ग्रामप्रशासन
- समिती व शिफारसी
- घटनादुरुस्ती
- ग्रामसभा व ग्रामपंचायत
- ग्रामसेवक
- पंचायत समिती
- जिल्हा परिषद
- मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
- गटविकास अधिकारी (BDO)
- नगरपरिषद / नगरपालिका
- महानगरपालिका
- ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
- सामान्य विज्ञान
- विविध शास्त्रे व अभ्यासविषय
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
- शोध व त्यांचे जनक
- शास्त्रीय उपकरणांचे कार्य
- राज्यघटना
- भारताची राज्यघटना
- राष्ट्रपती / उपराष्ट्रपती
- लोकसभा / राज्यसभा
- विधानसभा / विधानपरिषद
- परिशिष्टे
- मूलभूत कर्तव्ये
- मूलभूत अधिकार
- मार्गदर्शक तत्वे
- राज्यपाल / मुख्यमंत्री
- पंतप्रधान
- संसद
- सामान्य ज्ञान
- विकास योजना: संपूर्ण योजना
- पुरस्कार:
- महाराष्ट्रचे
- राष्ट्रीय
- शौर्य
- क्रीडा संबंधित
- आंतरराष्ट्रीय
- क्रीडा:
- खेळ व संबंधित चषक
- देश व राष्ट्रीय खेळ
- खेळाडूंची संख्या
- मैदान व ठिकाण
- चिन्हे व प्रतीके
- स्पर्धा: आशियाई, राष्ट्रकुल, क्रिकेट
निष्कर्ष
मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2025 ही एक प्रतिष्ठेची संधी आहे. जर तुम्ही ही परीक्षा देण्याचा निश्चय केला असेल, तर आजपासूनच अभ्यासक्रमाच्या आधारे नियोजनपूर्वक तयारी सुरू करा.
योग्य अभ्यास, सातत्य, आणि सराव – या त्रिसूत्रीवर भर दिल्यास यश निश्चित आहे.
👉 Test Series, Daily MCQs, आणि अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा – Ganitiguru.com
अभ्यास सुरू ठेवा, यश तुमचं आहे!
गणितिगुरुला टेलीग्रामवर फॉलो करा

Nice