महाराष्ट्र तलाठी भरती 2025 – 4,500+ जागांसाठी सुवर्णसंधी
तलाठी होण्याचे स्वप्न साकार करा!
Talathi Bharti Syllabus 2025 in Marathi :- तलाठी भरती 2025 साठी इच्छुक उमेदवारांसाठी ही पोस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तलाठी पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत तसेच तलाठी काय काम करतो याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन येथे दिलेले आहे.
- पदाचे नाव: तलाठी
- परीक्षा पद्धत: ऑनलाईन (Computer Based Test)
- प्रश्नांची संख्या: 100
- एकूण गुण: 200
- कालावधी: 2 तास (120 मिनिटे)
- नेगेटिव्ह मार्किंग : नेगेटिव्ह मार्किंग लागू नाही.
- मुलाखत: नाही
तलाठी भरती अभ्यासक्रम 2025 | Talathi Bharti Syllabus 2025 in Marathi
तलाठी भरतीची परीक्षा महाराष्ट्र महसूल व वन विभागामार्फत घेतली जाते. परीक्षा MCQ स्वरूपात असते.
विषय | प्रश्न संख्या | गुण |
---|---|---|
मराठी | 25 | 50 |
इंग्रजी | 25 | 50 |
सामान्य ज्ञान | 25 | 50 |
अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 प्रश्न | 200 गुण |
तलाठी भरती वयोमर्यादा 2025
प्रवर्ग | वयोमर्यादा |
---|---|
खुला | 18 ते 38 वर्षे |
राखीव | 18 ते 43 वर्षे |
दिव्यांग / माजी सैनिक / प्रकल्पग्रस्त | 18 ते 45 वर्षे |
तलाठी भरती अभ्यासक्रम 2025 | Talathi Bharti 2025 Syllabus in Marathi
मराठी भाषा
- मराठी व्याकरण
- वाक्य आणि वाक्यरचना
- शब्दांचे अर्थ
- प्रयोग व प्रयोगांचे प्रकार
- समास
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व म्हणींचे अर्थ
- वाक्य प्रचार
- शब्दसंग्रह
- प्रसिद्ध पुस्तके आणि पुस्तकांचे लेखक
- संत व संतांची नावे व माहिती इत्यादी.
इंग्रजी भाषा
- Grammar: Tense, Voice, Narration, Preposition, Article, Synonyms, Antonyms
- Sentence Correction, Fill in the Blanks
- Idioms and Phrases
- Simple & Complex Sentence Structures
सामान्य ज्ञान
- भूगोल
- महाराष्ट्र
- भारत
- जग
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
- आधुनिक भारताचा इतिहास
- नागरिकशास्त्र
- अर्थव्यवस्था
- पंचायत राज
- भारताची राज्यघटना
- सामान्य विज्ञान
- संगणक शास्त्र (माहिती आणि तंत्रज्ञान)
- समाजसुधारक
- चालू घडामोडी
बौद्धिक चाचणी / अंकगणित
- अंकगणित
- बेरीज -वजाबाकी
- गुणाकार – भागाकार
- सरळव्याज – चक्रवाढ व्याज
- काळ-काम-वेग
- नफा – तोटा
- शेकडेवारी
- समचलन – व्यस्तचलन
- मापे व परिमाणे इत्यादी.
- बुद्धिमत्ता चाचणी
- अंकमालिका
- अक्षरमालिका
- व्हेन आकृत्या
- विसंगत संख्या ओळखणे
- संख्या सहसंबंध
- आकृत्यांवर आधारित प्रश्न
- आकृत्यांची संख्या मोजणे
- कूट प्रश्न
- नातेसंबंधावर आधारित प्रश्न इत्यादी.
तलाठी पदासाठी पात्रता (Eligibility)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- MSCIT प्रमाणपत्र आवश्यक (नसेल तर नियुक्तीपासून 2 वर्षांत सादर करावे)
- भारतीय नागरिकत्व आवश्यक
तलाठी कोणत्या कामांसाठी जबाबदार असतो?
- शेती व जमिनीच्या नोंदी ठेवणे
- शेतसारा गोळा करणे
- जमीन व्यवहाराचे रेकॉर्ड तयार करणे
- सज्जा म्हणजे तलाठ्याचे कार्यालयीन क्षेत्र
तयारीसाठी महत्त्वाचे टिप्स:
- दररोज 2 तास वाचन + सराव पेपर सोडवा
- चालू घडामोडींसाठी दररोज मराठी न्यूजपेपर वाचा
- तलाठी विशेष पुस्तकांचा अभ्यास करा
Talathi Bharti 2025 – संधीचे सोनं करा!
जर तुम्ही पदवीधर असाल आणि तलाठी होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर आजपासूनच नियोजनबद्ध अभ्यास सुरू करा. योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास हे स्वप्न पूर्ण नक्कीच होईल.
Follow करा – Ganitiguru
नवीन भरती अपडेट्स, गणित ट्रिक्स, टेस्ट सिरीज व मार्गदर्शनासाठी आमचे अपडेट्स पाहत रहा.
Visit: www.ganitiguru.com
तुमच्या यशस्वी भविष्यासाठी Ganiti Guru टीमच्या शुभेच्छा!
पोस्ट आवडल्यास शेअर करा, तुमच्या मित्रांनाही फायदा होईल!
अभ्यास सुरू ठेवा, यश तुमचं आहे!
गणितिगुरुला टेलीग्रामवर फॉलो करा

Lavangi,Tal.s.solapur, solapur
Pingback: Police Bharti Syllabus 2025 in Marathi | महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम 2025 |
Pingback: MPSC AMVI भरती अभ्यासक्रम 2025 | MPSC AMVI Bharti Syllabus 2025 |