मापन पद्धती | Units and Measurement in Marathi
मानवजातीच्या प्रगतीत मापनाची एकके यांचा फार मोठा वाटा आहे. प्राचीन काळापासूनच वस्तूंची लांबी, वजन, वेळ, क्षेत्रफळ, तापमान इत्यादी मोजण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जात होत्या. मात्र त्या सर्व पद्धती ठिकाणानुसार बदलत असल्यामुळे एकसारखेपणा आणि अचूकता राखणे कठीण होत होते.
विज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य आणि दैनंदिन जीवनात मान्यताप्राप्त एकक प्रणाली वापरणे आवश्यक झाले. यामुळे मोजमापांमध्ये एकरूपता आली आणि SI एकक पद्धत जगभर मान्य झाली. SI पद्धत ही मेट्रिक पद्धतीवर आधारित असून सात मूलभूत एककांवर उभी आहे, ज्यावरून इतर सर्व साधित व विशेष एकके तयार होतात.
मापन आणि एककांचे ज्ञान केवळ गणितीय गणनेसाठीच नाही तर तंत्रज्ञान, संशोधन आणि औद्योगिक उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.
राशी (Quantity) म्हणजे काय?
एखादी वस्तू किंवा पदार्थ फक्त अंकांच्या सहाय्याने व्यक्त करता आला, तर त्याला राशी म्हणतात.
उदाहरणे: लोकसंख्या, व्यक्तींचे वय, वस्तूंचे वजन, वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या इत्यादी.
भौतिक राशी (Physical Quantity) म्हणजे काय?
पदार्थ, वस्तू किंवा कोणत्याही भौतिक गुणधर्माचे मोजमाप करून ते संख्यात्मक स्वरूपात व्यक्त करता आले, तर त्याला भौतिक राशी म्हणतात.
उदाहरणे: वस्तूमान, लांबी, चाल, विद्युतधारा, वेळ, घनता, कार्य इत्यादी.
भौतिक राशींचे प्रकार (Types of Physical Quantities)
1) अदिश राशी (Scalar Quantities)
- परिभाषा: ज्यांना मोजण्यासाठी केवळ परिमाणाची आवश्यकता असते.
- दिशा नसते.
- उदाहरणे: वस्तूमान, चाल, तापमान, आकारमान, घनता, कार्य, ऊर्जा इत्यादी.
2) सदिश राशी (Vector Quantities)
- परिभाषा: ज्यांना मोजण्यासाठी परिमाण आणि दिशा दोन्ही आवश्यक असतात.
- आलेख किंवा बाणाच्या साहाय्याने दर्शविल्या जातात.
- उदाहरणे: बल, वेग, संवेग, वजन, त्वरण, विस्थापन इत्यादी.
एककांच्या पद्धती (System of Units)
भौतिक राशींचे मापन करण्यासाठी इतिहासात विविध एकक पद्धती वापरल्या गेल्या आहेत. त्यापैकी प्रमुख चार पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.
1) ब्रिटीश पध्दत (FPS System – Foot, Pound, Second):-
ब्रिटीश पद्धत ही मापनाची एक ऐतिहासिक पद्धत आहे. या पद्धतीत:
- लांबीचे एकक: फुट (Foot) किंवा इंच (Inch)
- वस्तुमानाचे एकक: पाऊंड (Pound)
- वेळेचे एकक: सेकंद (Second)
या पद्धतीला F.P.S. पद्धत असेही म्हटले जाते, कारण यात Foot, Pound आणि Second या तीन मूलभूत एककांचा वापर होतो.
इतिहास
- विसाव्या शतकात विल्यम स्ट्रॉड यांनी इंग्लंडमध्ये लांबी, वस्तुमान आणि वेळ यांचे मापन करण्यासाठी फुट, पाऊंड आणि सेकंद या एककांचा वापर सुरू केला.
- त्यामुळे याला ब्रिटीश एककांची पद्धत असेही संबोधले जाते.
- भारतात ही पद्धत आता अधिकृतरीत्या वापरली जात नाही.
- तरीदेखील काही व्यवहारिक प्रसंगी अजूनही लोक या एककांचा वापर करतात.
महत्त्वाचे रूपांतरे
- 1 फुट = 30.48 से.मी.
- 1 पाऊंड = 0.454 कि.ग्रॅ.
FPS System | ||
नाव (Name) | चिन्ह (Symbol) | एकक (Unit) |
लांबी (Length) | ft | फुट (foot) |
वस्तुमान (Mass) | lb | पौंड(pound) |
वेळ (Time) | s | सेकंद (Second) |
2) मेट्रिक पद्धत (Metric System):-
मेट्रिक पद्धत ही जगभर मान्य असलेली आणि सर्वाधिक वापरली जाणारी मापन प्रणाली आहे. यात:
- लांबीचे एकक: मीटर (Meter) किंवा सेंटीमीटर (Centimeter)
- वस्तुमानाचे एकक: किलोग्रॅम (Kilogram) किंवा ग्रॅम (Gram)
- वेळेचे एकक: सेकंद (Second)
या पद्धतीत दोन उपप्रकार आहेत :
1) M.K.S. पद्धत (Meter – Kilogram – Second System)
- इ.स. 1901 मध्ये जीऑर्गी यांनी ही संकल्पना मांडली परंतु प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर या पद्धतीचा वापर 1940 पासून सुरु झाला. यामध्ये लांबी, वस्तुमान आणि वेळ यांच्या मापनासाठी मीटर, कि. ग्रॅ. आणि सेकंद या एककांचा वापर केला गेला.
MKS System | ||
नाव (Name) | चिन्ह (Symbol) | एकक (Unit) |
लांबी (Length) | m | मीटर (Meter) |
वस्तुमान (Mass) | kg | किलोग्राम (Kilogram) |
वेळ (Time) | s | सेकंद (Second) |
2) C.G.S. पद्धत (Centimeter – Gram – Second System)
- 1832 मध्ये कार्ल गॉस या शास्त्रज्ञाने सीजीएस (CGS) पद्धतीची संकल्पना मांडली. त्यांने लांबी, वस्तुमान आणि वेळ या राशींच्या मापनासाठी सेंटीमिटर, ग्रॅम आणि सेकंद या एककांचा वापर केला. या पद्धतीलाच मेट्रीक किंवा फ्रेंच एककांची पद्धत असेही म्हणतात.
CGS System | ||
नाव (Name) | चिन्ह (Symbol) | एकक (Unit) |
लांबी (Length) | cm | सेंटीमीटर (centimeter) |
वस्तुमान (Mass) | gm | ग्रॅम (gram) |
वेळ (Time) | s | सेकंद (Second) |
3) एसआय पद्धत (SI System – International System of Units)
एसआय पद्धत ही आधुनिक आणि जागतिक स्तरावर मान्य असलेली मापन पद्धत आहे.
- पूर्ण नाव: Système International d’Unités (International System of Units)
- मूळ: ही पद्धत मेट्रिक पद्धतीवर आधारित असून M.K.S. पद्धतीचे विस्तारीत आणि सुधारित रूप आहे.
- वापर: आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक वापरली जाणारी मापन प्रणाली.
- इ.स. 1960 मध्ये जिनिव्हा (Geneva) येथे वजन आणि मापन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत SI पद्धतीला अधिकृत मान्यता देण्यात आली.
वैशिष्ट्ये
- आधुनिक आणि मानक पद्धत – विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि दैनंदिन जीवनात सार्वत्रिक वापर.
- एकसमान एकके – जगभर एकच पद्धत वापरल्याने मोजमापात गोंधळ कमी होतो.
- M.K.S. पद्धतीवर आधारित – लांबीसाठी मीटर, वस्तुमानासाठी किलोग्रॅम आणि वेळेसाठी सेकंद ही मूलभूत एकके.
मापनाची एकके (Units of Measurement)
कोणत्याही भौतिक राशीचे मापन करण्यासाठी ठरवलेले निश्चित आणि प्रमाणित मानक एकक (Unit) म्हणून ओळखले जाते.
जेव्हा एखादी राशी या एककाच्या आधाराने मोजली जाते, तेव्हा त्या प्रक्रियेला मापन (Measurement) म्हणतात.
1) मूलभूत एकके (Fundamental Units)
ज्या भौतिक राशींचे मापन स्वतंत्र मानक एककांद्वारे करता येते आणि ज्यांना इतर एककांवर अवलंबून राहावे लागत नाही, त्यांना मूलभूत एकके म्हणतात.
- सुरुवातीला फक्त लांबी, वस्तुमान आणि वेळ या तीन राशींचेच मूलभूत एकके मानले जात होते.
- नंतरच्या काळात विद्युतधारा, तापमान, प्रकाशाची तीव्रता आणि पदार्थाचे प्रमाण (रेणूभार) यांचा देखील समावेश झाला.
- आजच्या घडीला एकूण 7 मूलभूत एकके आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य आहेत.
उदाहरणे: मीटर (लांबी), किलोग्रॅम (वस्तुमान), सेकंद (वेळ), केल्विन (तापमान), अँपिअर (विद्युतधारा), कॅंडेला (प्रकाशाची तीव्रता), मोल (पदार्थाचे प्रमाण).
मुलभूत एकके | ||
नाव (Name) | चिन्ह (Symbol) | एकक (Unit) |
लांबी (Length) | m | मीटर (Meter) |
वस्तुमान (Mass) | kg | किलोग्राम (Kilogram) |
वेळ (Time) | s | सेकंद (Second) |
तापमान (Temprature) | k | केल्विन (Kelvin) |
विद्युत प्रवाह (Electric Current) | A | एम्पीयर (Ampere) |
अनुदिप्त तीव्रता (Luminous Intensity) | cd | कॅन्डेला (Candela) |
रेणुभार (Amount of Substance) | mol | मोल (Mole) |
2) साधित एकके (Derived Units)
ज्या राशींचे मापन करण्यासाठी दोन किंवा अधिक मूलभूत एकके एकत्र वापरावी लागतात, त्यांना साधित एकके म्हणतात.
- या एककांना स्वतंत्र अस्तित्व नसते, कारण ती मूलभूत एककांवर आधारित असतात.
- साधित राशी म्हणजे मूलभूत राशींमधून तयार झालेल्या राशी.
उदाहरणे:
- बल (न्युटन = किग्रा·मी/से²)
- कार्य (जूल = किग्रा·मी²/से²)
- घनता (किग्रा/मी³)
- क्षेत्रफळ (मी²)
- घनफळ (मी³)
नाव | एकक | चिन्ह | Expressed in SI Base Unit | Expressed in other SI units |
बल, वजन | न्यूटन | N | kg⋅m⋅s-2 | – |
वारंवारता | हर्ट्झ | Hz | s-1 | – |
विद्युतप्रभार | कुलॉम्ब | C | s⋅A | – |
विभावंतर | व्होल्ट | V | kg.m2.s-3.A-1 | W/A |
Inductance | Henry | H | kg.m2.s-2.A-2 | Wb/A |
Capacitance | Farad | F | kg−1.m−2.s4.A2 | C/V |
रोध, Impedance, Reactance | ओहम | Ω | kg.m2.s−3.A−2 | V/A |
Electrical conductance | Siemens | S | kg−1.m−2.s3.A2 | Ω−1 |
Magnetic flux | Weber | Wb | kg.m2.s−2.A−1 | V⋅s |
Magnetic flux density | Tesla | T | kg.s−2.A−1 | Wb/m2 |
ऊर्जा, कार्य, उष्णता | ज्यूल | J | kg.m2.s−2 | N⋅m = Pa⋅m3 |
शक्ती | वॅट | W | kg.m2.s−3 | J/s |
कोन | Radian | rad | m.m−1 | – |
किरणोत्सर्ग | Becquerel | Bq | s-1 | – |
Luminous flux | Lumen | lm | cd | cd⋅sr |
3) प्रकेवल एकके (Absolute Units)
- वस्तुमान या मूलभूत राशीवर आधारित एकके.
- बलाच्या मापनासाठी वापरली जाणारी एकके.
उदाहरणे: डाइन, न्यूटन, पोंडल.
4) गुरुत्त्वीय एकके (Gravitational Units)
- बल किंवा वजन यांच्या मापनासाठी वापरली जाणारी एकके.
- गुरुत्वीय आकर्षणाच्या प्रभावावर आधारित.
उदाहरणे: पौंड (Pound), ग्रॅम (Gram), किलोग्रॅम (Kilogram).
व्यवहारात वापरण्यासाठी वरिल मुलभूत एकका पासून कांही मापके तयार केलेली आहेत. त्याची एकके करण्यासाठी लागणारी उपपदे खालील प्रमाणे आहेत.
उपसर्ग (Prefix) | अंक | अंकात्मक किमंत |
पिको | 10-12 | 0.000000000001 |
नानो | 10-9 | 0.000000001 |
मायक्रो | 10-6 | 0.000001 |
मिली | 10-3 | 0.001 |
सेंटी | 10-2 | 0.01 |
डेसी | 10-1 | 0.1 |
डेका | 101 | 10 |
हेक्टो | 102 | 100 |
किलो | 103 | 1000 |
मेगा | 106 | 1000000 |
गीगा | 109 | 1000000000 |
लांबीचे मापन (Measurement of Length)
लांबी ही एखाद्या वस्तूची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची अंतराची मोजमाप आहे. यासाठी विविध एककांचा वापर केला जातो.
लांबीची एकके आणि त्यांचे रूपांतरण
मूलभूत मापन पद्धत (Metric System)
- 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर
- 10 सेंटीमीटर = 1 डेसीमीटर
- 10 डेसीमीटर = 1 मीटर
- 10 मीटर = 1 डेकामीटर
- 10 डेकामीटर = 1 हेक्टोमीटर
- 10 हेक्टोमीटर = 1 किलोमीटर
- 1000 मीटर = 1 किलोमीटर
लांबीचे रूपांतरण (Length Conversion)
मीट्रिक आणि इम्पीरियल (British) पद्धतीतील रूपांतरण
- 1 मीटर = 39.37 इंच
- 1 किलोमीटर = 0.6213 मैल
- 1 इंच = 25.4 मिलीमीटर
- 1 यार्ड = 0.914 मीटर
- 1 मैल = 1.619 किलोमीटर
- 1 मैल = 1619 मीटर
वस्तुमान मापन व रूपांतरण (Measurement and Conversion of Mass)
वस्तुमान म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये असलेल्या पदार्थाचे परिमाण. याचे मापन विविध पद्धतींनी केले जाते, जसे मीट्रिक पद्धत आणि ब्रिटीश (Imperial) पद्धत.
मीट्रिक पद्धतीतील मापन
- 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल
- 1000 किलोग्रॅम = 1 मेट्रीक टन
मीट्रिक ते ब्रिटीश पद्धतीतील रूपांतरण
- 1 किलोग्रॅम = 2.204 पौंड (Pounds)
- 1 मेट्रीक टन = 0.9842 ब्रिटीश टन
- 1 ब्रिटीश टन = 1.016 मेट्रीक टन
- 1 पौंड = 453.592 ग्रॅम
कालमापन (Measurement of Time)
वेळ मोजण्यासाठी सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष अशा एककांचा वापर केला जातो. खालीलप्रमाणे त्यांचे परस्पर संबंध आहेत.
वेळ मापनातील मूलभूत रूपांतरण
- 60 सेकंद = 1 मिनिट
- 60 मिनिट = 1 तास
- 24 तास = 1 दिवस
- 365 दिवस = 1 वर्ष *
- 100 वर्ष = 1 शतक
लिप वर्ष (Leap Year) म्हणजे काय?
- लिप वर्षात 366 दिवस असतात.
- फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात.
- लिप वर्ष प्रत्येक 4 वर्षांनी येते.
- लिप वर्षाचे नियम:
- जर वर्ष 4 ने पूर्ण भाग जाणारे असेल तर ते लिप वर्ष असते.
- पण जर वर्ष 100 ने पूर्ण भाग जाणारे असेल, तर ते लिप वर्ष नसते.
- मात्र, जर वर्ष 400 नेही पूर्ण भाग जाणारे असेल, तर ते लिप वर्ष ठरते.
उदाहरण:
- लिप वर्ष: 1600, 2000, 2024
- लिप वर्ष नसलेले: 1700, 1800, 1900
कोन मापन (Angle Measurement)
कोन मोजण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. त्यातील प्रमुख तीन पद्धती पुढीलप्रमाणे आहेत:
1) सेक्झागेसीमल पद्धत (Sexagesimal Method)
- 60 सेकंद (“) = 1 मिनिट (‘)
- 60 मिनिट (‘) = 1 अंश (°)
- 360° = 1 पूर्ण कोन
- ही पद्धत प्रामुख्याने गणित, नकाशे व भूगोल मापनामध्ये वापरली जाते.
2) सेटेसिमल पद्धत (Setesimal Method)
- 100 सेकंद = 1 मिनिट
- 100 मिनिट = 1 ग्रेड
- 90° = 100 ग्रेड
- ही पद्धत विशेषतः अभियांत्रिकी (engineering) आणि काही तांत्रिक गणनांमध्ये वापरली जाते.
3) रेडीयन पद्धत (Radian Method)
- π रेडीयन = 180°
- 1 रेडीयन ≈ 57.3° (जवळपास)
- 2π रेडीयन = 1 पूर्ण कोन (360°)
- ही पद्धत गणित, त्रिकोणमिती आणि भौतिकशास्त्रात अधिक प्रमाणात वापरली जाते.
क्षेत्रफळ मापन व रूपांतरण (Measurement and Conversion of Area)
क्षेत्रफळ मापन म्हणजे एखाद्या सपाट पृष्ठभागाने व्यापलेली जागा मोजणे. हे मापन विविध एककांमध्ये केले जाते आणि त्यांचे परस्पर रूपांतरण खालीलप्रमाणे आहे.
क्षेत्रफळ मापनाचे रूपांतरण (Area Conversion)
मापन (Measurement) | रूपांतरण (Conversion) |
---|---|
1 चौरस सेंटीमीटर (cm²) | = 100 चौरस मिलीमीटर (mm²) |
1 चौरस मीटर (m²) | = 10,000 चौरस सेंटीमीटर (cm²) |
1 आर | = 100 चौरस मीटर (m²) |
1 हेक्टर (ha) | = 100 आर |
1 चौरस किलोमीटर (km²) | = 100 हेक्टर (ha) |
1 हेक्टर (ha) | = 2.47 एकर (acres) |
1 चौरस मीटर (m²) | = 1.196 चौरस यार्ड (yd²) |
1 चौरस किलोमीटर (km²) | = 0.386 चौरस मैल (mi²) |
1 चौरस इंच (in²) | = 6.452 चौरस सेंटीमीटर (cm²) |
घनफळ मापन व रूपांतरण (Measurement and Conversion of Volume)
घनफळ म्हणजे कोणत्याही वस्तूने व्यापलेली त्रिमितीय जागा. याचे मापन मेट्रिक व ब्रिटीश पद्धतींमध्ये विविध एककांमध्ये केले जाते.
मापन (Measurement) | रूपांतरण (Conversion) |
---|---|
1 घन सेंटीमीटर (cm³) | = 0.061 घन इंच (in³) |
1 घन इंच (in³) | = 16.4 घन सेंटीमीटर (cm³) |
1 घन मीटर (m³) | = 35.31 घनफूट (ft³) |
धारकत्व मापन व रूपांतरण (Measurement and Conversion of Capacity)
धारकत्व म्हणजे कोणत्याही भांड्यात किंवा पात्रात द्रव पदार्थ सामावण्याची क्षमता. हे लिटर, मिली लिटर, गॅलन इत्यादी एककांमध्ये मोजले जाते.
मापन (Measurement) | रूपांतरण (Conversion) |
---|---|
1 लिटर (L) | = 1000 मिली लिटर (mL) |
1 किलो लिटर (KL) | = 1000 लिटर (L) |
1 लिटर (L) | = 1000 घन सेंटीमीटर (cm³) |
1 लिटर (L) | = 0.219 गॅलन (gal) |
1 गॅलन (gal) | = 4.546 लिटर (L) |
1 लिटर (L) | = 61.02 घन इंच (in³) |
बलाचे एकक व रूपांतरण (Measurement and Conversion of Force)
बल (Force) म्हणजे एखाद्या वस्तूवर लावलेला असा परिणाम जो तिच्या वेग, दिशा किंवा आकारात बदल घडवतो. बलाचे मापन करण्यासाठी विविध एकके वापरली जातात.
1. बलाची एकके (Units of Force)
- प्रकेवल एकक (Absolute Units)
- डाईन (Dyne)
- न्युटन (Newton)
- गुरुत्वीय एकक (Gravitational Units)
- ग्रॅम-बल (gf)
- किलोग्रॅम-बल (kgf)
2. बलाचे रूपांतरण
मापन (Measurement) | रूपांतरण (Conversion) |
---|---|
1 ग्रॅम-बल (gf) | = 981 डाईन |
1 किलोग्रॅम-बल (kgf) | = 9.81 न्युटन (N) |
1 न्युटन (N) | = 10⁵ डाईन |
1 न्युटन (N) | = 0.2248 पौंड (lb) |
1 न्युटन (N) | = 7.882 पौंडल (poundal) |
कार्याचे एकक व रूपांतरण (Measurement and Conversion of Work)
कार्य (Work) म्हणजे बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन घडवून आणलेली ऊर्जा. कार्याचे मापन भौतिकशास्त्रात विविध पद्धतींनी केले जाते.
1. कार्याची एकके (Units of Work)
- SI पद्धत (SI Units)
- ज्युल (Joule)
- प्रकेवल एकके (Absolute Units)
- डाईन-सेंटीमीटर (dyne·cm) किंवा अर्ग (erg)
- न्युटन-मीटर (N·m) किंवा ज्युल (J)
- गुरुत्वीय एकके (Gravitational Units)
- ग्रॅम-सेंटीमीटर (gf·cm)
- किलोग्रॅम-मीटर (kgf·m)
2. कार्याचे रूपांतरण (Work Conversion)
मापन (Measurement) | रूपांतरण (Conversion) |
---|---|
1 ग्रॅम-सेंटीमीटर | = 981 अर्ग |
1 किलोग्रॅम-मीटर | = 9.81 ज्युल |
1 ज्युल (J) | = 10⁷ अर्ग |
1 ज्युल (J) | = 0.7375 फुट-पौंड (ft·lb) |
1 ज्युल (J) | = 23.747 फुट-पौंडल (poundal) |
1 वॅट-अवर (Wh) | = 3600 ज्युल |
1 किलोवॅट-अवर (kWh) | = 36 × 10⁵ ज्युल |
1 किलोवॅट-अवर (kWh) | = 1000 वॅट-अवर |
शक्तीचे एकके व रूपांतरण (Measurement and Conversion of Power)
शक्ती (Power) म्हणजे कार्य करण्याचा वेग, म्हणजेच प्रति सेकंद केलेले कार्य. शक्तीचे मापन अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र आणि विद्युत प्रणालींमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे.
1. शक्तीची एकके (Units of Power)
- SI पद्धत (SI Unit)
- वॅट (Watt) – 1 वॅट = 1 ज्युल / सेकंद
- प्रकेवल एकके (Absolute Units)
- अर्ग / सेकंद (erg/s)
- डाईन·सेंटीमीटर / सेकंद (dyne·cm/s)
- ज्युल / सेकंद (J/s)
- न्युटन·मीटर / सेकंद (N·m/s)
2. शक्तीचे रूपांतरण (Power Conversion)
मापन (Measurement) | रूपांतरण (Conversion) |
---|---|
1 मेट्रिक हॉर्सपावर (HP) | = 75 कि.ग्रॅ·मीटर / सेकंद |
= 4500 कि.ग्रॅ·मीटर / मिनिट | |
= 735.5 वॅट | |
= 735.5 ज्युल / सेकंद | |
1 वॅट (W) | = 1 ज्युल / सेकंद |
= 10⁷ अर्ग / सेकंद | |
= 0.737 फुट-पौंड / सेकंद | |
1 मेट्रिक HP | = 0.9859 ब्रिटिश हॉर्सपावर |
उष्णतेची एकके व रूपांतरण
उष्णता (Heat) म्हणजे ऊर्जा जी उष्ण वस्तूपासून थंड वस्तूकडे प्रवाहित होते. उष्णतेचे मोजमाप करण्यासाठी विविध पद्धती व एकके वापरली जातात.
1. उष्णतेची प्रमुख एकके (Units of Heat)
- कॅलरी (Calorie) — 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1°C ने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता.
- ज्युल (Joule) — SI पद्धतीतील उष्णतेचे एकक.
- ब्रिटीश थर्मल युनिट (British Thermal Unit – BTU) — 1 पौंड पाण्याचे तापमान 1°F ने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता.
- सेंटीग्रेड हीट युनिट (CHU) — 1 पौंड पाण्याचे तापमान 1°C ने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता.
2. उष्णतेचे रूपांतरण (Heat Conversion)
मापन (Measurement) | रूपांतरण (Conversion) |
---|---|
1 कॅलरी (cal) | = 4.18 ज्युल (J) |
= 3.08 फुट-पौंड (ft·lb) | |
1 ब्रिटीश थर्मल युनिट (BTU) | = 252 कॅलरी |
1 सेंटीग्रेड हीट युनिट (CHU) | = 1899 ज्युल |
= 1.8 ब्रिटीश थर्मल युनिट |
तापमानाचे एकके व रूपांतरण (Measurement and Conversion of Temperature)
तापमान (Temperature) म्हणजे वस्तू किती गरम किंवा थंड आहे याचे मापन. यासाठी विविध मापन पद्धती व एकके वापरली जातात.
तापमानाचे एकके व रूपांतरण (Measurement and Conversion of Temperature):-
- ब्रिटीश मापन पध्दतीत तापमानाचे एकक अंश फॅरनहीट आहे. या पध्दती प्रमाणे पाण्याचा उत्कलन बिंदू 212° F असतो व पाण्याचा गोठण्याचा बिंदू 32° F असतो. फॅरन हिट स्केलवर 32 ते 212 अशी मार्किंग करून 180 भाग केलेले असतात.
- मेट्रीक पध्दतीत तापमानाचे एकके अंश सेंटीग्रेड (सेल्सीयस) आहे. या पध्दती प्रमाणे पाण्याचा उत्कलन बिंदु 100°C असतो. व पाण्याचा गोठण्याचा बिंदु असतो. सेंटीग्रेड स्केलवर 0 ते 100 अशी मार्किंग करून 100 माग केलेले असतात.
- SI पध्दतीत तापमानाचे एकके केलव्हिन (K) आहे. फॅरनहिट, सेंटीग्रेड आणि केलव्हिन यांच्यातील परस्पर संबंध व रूपान्तरण करण्यासाठी खालील सूत्र आहे.
- °F = (9C+32) /5
- t°K = t°C+273
तापमान मापन पद्धती (Temperature Scales)
पद्धत / स्केल | एकक | पाण्याचा गोठण्याचा बिंदू | पाण्याचा उत्कलन बिंदू |
---|---|---|---|
फॅरनहिट (Fahrenheit – °F) | अंश फॅरनहिट | 32°F | 212°F |
सेंटीग्रेड / सेल्सियस (Centigrade / Celsius – °C) | अंश सेल्सियस | 0°C | 100°C |
केल्विन (Kelvin – K) | केल्विन | 273 K | 373 K |
Frequently Asked Questions – Units and Measurement – FAQs
1. SI एकक प्रणाली (SI Units) कधी स्थापन करण्यात आली?
उत्तर: 1960 साली, जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत SI एकक प्रणाली स्वीकृत झाली.
2. एककांच्या एकूण किती पद्धती आहेत?
उत्तर: एककांच्या एकूण चार पद्धती आहेत:
CGS पद्धत (Centimeter–Gram–Second)
MKS पद्धत (Meter–Kilogram–Second)
FPS पद्धत (Foot–Pound–Second)
SI पद्धत (Système International d’Unités)
3. 1 कॅलरी = किती ज्युल?
उत्तर: 1 कॅलरी = 4.18 ज्युल
4. 1 ज्युल = किती अर्ग?
उत्तर: 1 ज्युल = 10⁷ अर्ग
5. 1 हॉर्सपावर (H.P.) = किती वॅट?
उत्तर: 1 एच.पी. = 746 वॅट
निष्कर्ष – मापनाची एकके (Units and Measurement in Marathi)
मापन ही विज्ञान व तंत्रज्ञानातील मूलभूत प्रक्रिया आहे. कोणत्याही भौतिक राशीचे परिमाण अचूकपणे ठरवण्यासाठी एक निश्चित व मान्यताप्राप्त एककांचा वापर केला जातो. SI एकक प्रणाली ही जगभर मान्य असलेली आधुनिक पद्धत आहे, जी मोजमापांमध्ये एकसारखेपणा आणि अचूकता राखते.
एकके तीन प्रकारची असतात — मूलभूत एकके, साधित एकके आणि विशेष एकके.
मूलभूत एककांपासून साधित एकके तयार होतात, तर विशेष एकके विशिष्ट मोजमापासाठी वापरली जातात.
वेगवेगळ्या राशींसाठी लांबी, वस्तुमान, वेळ, तापमान, बल, कार्य, ऊर्जा इत्यादींचे मापन वेगवेगळ्या एककांत केले जाते आणि त्यांचे योग्य रूपांतरण समजून घेणे गरजेचे आहे.
मापनातील अचूकता, योग्य एककांची निवड, आणि आंतरराष्ट्रीय मानके पाळणे हे विज्ञान, उद्योग, शिक्षण आणि दैनंदिन जीवनात तितकेच महत्त्वाचे आहे.
अशा प्रकारे मापन व एककांचे ज्ञान हे भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानाचे भक्कम पायाभूत तत्त्व आहे.
अशाच रंजक आणि सोप्या विज्ञानविषयक माहिती, प्रयोग, आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी GanitiGuru ला फॉलो करा!
गणितासोबतच विज्ञानही आता सोपं आणि मजेदार!
गणितिगुरुला टेलीग्रामवर फॉलो करा
